Ads

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न करू -आ. प्रतिभा धानोरकर.

तालुका प्रतिनिधी (भद्रावती)जावेद शेख :-ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या असून त्यांनी त्या सदर कार्यक्रमातून मांडल्या त्यांच्या या समस्यांचा गांभीर्याने विचार करून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्या जाईल असे आश्वासन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शहरातील जेष्ठ नागरिकांना दिले.
Let's try to solve the problems of senior citizens: Pratibha Dhanorkar.
भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालगतच्या मोकळ्या मैदानावर नगर परिषदेतर्फे बांधण्यात आलेल्या जेष्ठ नागरिक समाजभवनाचे लोकार्पण आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रफुल चटकी, मोहन देशमुख, बळवंत दादा गुंडावार, चंद्रकांत गुंडावारष धनंजय अस्वले आदी मान्यवर उपस्थित होते. या समाजभवनाच्या माध्यमातून शहरातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काचे ठिकाण मिळाले असून त्याचा उपयोग जेष्ठ नागरिकांसाठी व त्यांच्या उपक्रमांसाठी होऊन त्यांना या माध्यमातून सुविधा मिळेल असे मत यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी व्यक्त केले. भद्रावती नगर परिषदेतर्फे शहरातील पंचायत समिती कार्यालया जवळील मोकळ्या जागेत वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार समाज भवन बांधण्यात आले. यासाठी जवळपास 30 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. या समाज भवनामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे. याप्रसंगी शहरातील जेष्ठ नागरिक काशीराम मनगटे, अण्णाजी खुटेमाटे व प्रबुद्ध जेष्ठ नागरिक संघ, सुंमठाणा यांनी आपापले मनोगत व्यक्त करून जेष्ठ नागरिकांच्या समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन काशिराम मनगटे यांनी केले.कार्यक्रमाला नगरसेवक विनोद वानखेडे, चंद्रकांत खारकर,लक्ष्मी पारखी,जयश्री दातारकर,प्रतिभा सोनटक्के, रेखा राजुरकर,लिला ढुमणे,शोभा पारखी यांचसह शहरातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment