Ads

बुरुड हा कष्टकरी समाज - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :बांबुपासुन सुप, टोपल्या तयार करणे हा आपला पारंपारिक व्यवसाय असून वाघाच्या किर्रर्र जंगलात जाऊन बांबु तोडणारा हा आपला धाडसी समाज आहे. आधुनिक काळात या वस्तूंना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आपला व्यवसाय टिकवताना आपल्याला धडपड करावी लागत आहेत. मात्र हा समाज प्रामाणीक आणि कष्टकरी आहे. आपल्यात आपल्या व्यवसायाला बदलत्या काळासोबत नव्या तज्ञण्याची जोड देण्याचे कौशल्य आहे. आपण आपला पारंपारिक व्यवसाय न सोडता आपल्यात उपजत असलेल्या हस्तकलेच्या कौशल्याचे प्रदर्शन करत जागतिक स्तराचा दर्जा असलेल्या वस्तुंची निर्मिती करा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Burud is a hardworking society-MLA.Kishore Jorgewar
नागपूर येथे राज्य स्तरीय बुरुड समाज उपवर - वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, बंडु गैणेवार, पुरुषोत्तमराव पूट्टेवार, विवेक चिलववार, अनुराधा पल्लडवार यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, आता प्लास्टिक सूप, प्लास्टिकच्या टोपल्या बाजारपेठांमध्ये आल्या आहेत. महिलांचा ओढा या वस्तूंकडे वाढला आहे. त्यामुळे आपला पारंपारि व्यवसाय टिकविण्याचे आव्हान भविष्यात समाजासमोर आहे. असे असले तरी शहरात व ग्रामीण भागामध्ये बांबुपासून तयार होणा-या वस्तूंना अजूनही मागणी आहे.माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, सणवार, रीती, परंपरा तसेच वाद्ये, सजावटीच्या वस्तू यामध्ये बांबूचा वापर दैनंदिन जीवनात आढळतो. या वस्तुंची मागणी आहे. त्यामुळे या व्यवसायात आणखी पारंगत होत यातुन आर्थिक प्रगती साधा असे यावेळी ते म्हणाले.
आज मी आमदार झालो असलो तरी माझ्या आईने टोपल्या विकण्याचा व्यवसाय बंद केला नाही. माझ्या परिवरातील अनेक सदस्य तिच्या सोबत आजही टोपल्या विकतात असेही यावेळी त्यांनी सांगितले. बुरुड समाजाला सहज बांबु उपलब्ध झाला पाहिजे यासाठी लोकप्रतिनीधी म्हणून माझे सातत्याने प्रयत्न सुरु असुन काही अंशी यात यशही आले असल्याचे ते यावेळी म्हणाले. आज येथे उपवर - वधू परिचय मेळाव्याचे आयोजन संपन्न होत आहे. असे आयोजनही समाजासाठी गरजेचे आहे. शैक्षणीक क्षेत्रात समाजाचा युवक मागे पडत आहे. सोबतच समाजाचे अनेक प्रश्न आहेत. याचे अशा आयोजनाच्या माध्यमातून चिंतन झाले पाहिजे.
विवाह संस्था टिकून राहल्या तरच समाजव्यवस्था व परिणामी भारतीय संस्कृती टिकेल. विवाहासारखे पवित्र बंधनही महागाईच्या विळख्यात सापडले आहे. अशात गरजू उपवर वधूंनी सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनांकडे पर्याय म्हणून पहिले पाहिजे. सामुहिक विवाह सोहळयांचे आयोजन वाढले असले तरी अशा सोहळयांमध्ये विवाह बद्ध होणा-या नव झोडप्यांची संख्या अपेक्षीत अशी वाढलेली नाही. त्यामूळे समाजानेही आता यात पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला बुरुड समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment