भद्रावती जावेद शेख - तालुक्यातील घोटनिंबाळा फाटा येथून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांच्या वाहनावर भद्रावती पोलिसांनी कारवाई करून सहा जनावरांची सुटका केली ही कारवाई पहाटे चारच्या दरम्यान करण्यात आली.Rescue of six animals going to slaughter.
स्वप्निल उर्फ सोनू स्वानंद शेंडे ,समीर आयुब कुरेशी दोन्ही राहणार चंद्रपूर असे आरोपींचे नाव आहे ठाणेदार बिपिन इंगळे यांना गुप्त माहिती मिळाली की नागपूर चंद्रपूर मुख्य मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ चार चाकी वाहनाद्वारे जनावरांची तस्करी होत आहे. त्या आधारे नाकाबंदी करून या वाहनाची तपासणी केली असता त्यात सहा जनावरे किंमत एक लाख तीस हजार व वाहन जप्त करण्यात आले यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. भद्रावती पोलिसांची आठवडाभऱ्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
सदरची कार्यवाही मा. आयुष नोपाणी साहेब यांचे मार्गदर्शनात पो नि. बिपीन इंगळे गुन्हे शोध पथकाचे सपोनि मुळे, पोलीस अंमलदार अनुप आस्तुणकर, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदारी यांनी केली.
0 comments:
Post a Comment