चंद्रपुर :-चंद्रपूर आम आदमी पार्टी तर्फे शहरातील बाबूपेठ परिसरात स्मशानभूमीची दयनीय अवस्था असल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्याच्या सौंदर्यकरणाचे कामाकरिता मनपाला सतत पाठपुरावा केल्यानंतर दलित विकास निधी मधून कोट्यवधीचा निधि मंजूर झाला. सोबतच त्या ठिकाणी काम देखील सुरू झाले परंतू सुरू असलेले काम हे निष्कृष्ट दर्ज्याचे असल्याची तक्रार आप च्या कार्यालयात आली तसेच आप चे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली असता त्याठिकाणी संबंधित कंत्राटदार काळी रेती वापरत असल्याचे निष्पन्न झाले.Use of black sand mixed with fine soil in the construction of Babupeth crematorium
सोबतच वॉल कम्पाउंड चे कॉलम चुकीच्या पद्दतीने घेतलेले आढळले. याबाबत मनपाचे इंजिनिअर पवार यांना आप तर्फे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली यावरुन आप च्या शिष्टमंडळाने त्यांना काम बंद करायला सांगितले. आणि जो पर्यंत ही रेती येथून उचलणार नाही व कॉलम व्यवस्थित करनार नाही तो पर्यंत काम सुरू करु नये असे संबंधित इंजिनिअर यांना सांगण्यात आले. माती मिश्रीत काळी रेती चा वापर डब्लुसीएल करते ती खराब रेती सरकारी कामाकरीता यांना कशी काय मिळाली आणि ते कामात वापरत असताना मनपाचे इंजिनियर झोपा काढत आहेत का? असा प्रश्न आपने उपस्थित केलेला आहे. यावर आयुक्तांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी आप तर्फे करण्यात आली आहे जर कारवाई न झाल्यास आंदोलनाची चेतावणी सुद्धा आप तर्फे देण्यात आली आहे.
यावेळेस आप चे शहर अध्यक्ष योगेश गोखरे, शहर सचिव राजू कुडे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, संघटन मंत्री रहेमान खान पठाण, अनुप तेलतुंबडे, जयदेव देवगडे, अजय बाथव, पवन प्रसाद, योगेश बिसेन, कृष्णा रणदिवे हे उपस्थित होते .
0 comments:
Post a Comment