Ads

घरातून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह नाल्यात आढळला.

भद्रावती जावेद शेख :घरून निघून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ढोरवासा- चारगाव रस्त्यावरील नाल्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना ढोरवासा- चारगाव या मार्गावरील नाल्यात दिनांक 29 रोज शनिवारला सकाळी उघडकीस आली.The dead body of the woman who left the house was found in the drain.
वंदना वसंता वरखडे वय 45 वर्षे, राहणार, ढोरवासा असे या मृतक महिलेचे नाव आहे. पुलावरून जाताना पाण्यात वाहून जाऊन तिचा मृत्यू झाला असल्याची शक्यता परिसरात व्यक्त केल्या जात आहे. मृतक महिला ही दिनांक 28 ला दुपारी तीन वाजता पासून आपल्या ढोरवासा येथील घरातून निघून गेली होती. ती बेपत्ता असल्याची तक्रारही करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी गावातील एक जोडपे या रस्त्याने जात असताना नाल्यातील झुडपात तीचे प्रेत अडकलेले दिसले. याची माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तिचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मर्ग दाखल केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक महिलेला दोन मुली व एक मुलगा आहे. तिच्या मृत्यूमुळे ढोरवासा गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment