Ads

अतिवृष्टीमुळे रोपवाटिकेत पुराचे पाणी साचून भाजीपाल्यांची रोपे नष्ट Due to heavy rains, the flood water accumulates in the nursery and destroys the vegetable plants

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:पिपरी येथील कृषिभूषण शेतकरी सुरेश आस्कर यांच्या अहिल्यादेवी रोपवाटिकेत पुराचे पाणी शिरून संपूर्ण भाजीपाल्यांची रोपे नष्ट झाली. यात आस्कर यांचे जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले आहे. सुरेश आस्कर यांनी शासनाकडून सबसिडीवर शेडनेट घेऊन त्यात त्यांनी भाजीपाल्यांच्या रोपांचा व्यवसाय सुरू केला होता. या रोपवाटिकेमध्ये त्यांनी मिरची, वांगी, टमाटर, फुलकोबी आदी भाजीपाल्यांची रोपे तयार केली होती. मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिपरी येथे पूर आला. या पुराचे सहा फूट पाणी आस्कर यांच्या रोपवाटिकेत दोन दिवस साचुध असल्यामुळे त्यांनी तयार केलेली भाजीपाल्याची सर्व रोपे नष्ट झाली.
Due to heavy rains, the flood water accumulates in the nursery and destroys the vegetable plants
यात रोपवाटिकेत ठेवलेल्या 10 बॅगा रासायनिक खत व सेंद्रिय खत सुद्धा नष्ट झाले. हिरवी मिरची, भेंडी व कारल्याचे पीकही नष्ट झाले. ही रोपे विकून आस्कर हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मात्र हे सर्व रोपे नष्ट झाल्याने त्यांचे जवळपास पाच लाख रुपयांची नुकसान झाले आहे. सदर रोपवाटिकेचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी सुरेश आस्कर यांनी शासनाकडे केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment