भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख:विविध गुन्ह्यात, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातून 11 मोटरसायकली चोरणाऱ्या भद्रावती शहरातील हनुमान नगर येथील आरोपी गणेश प्रल्हाद आडे, वय 32 वर्षे याला बेड्या ठोकण्यात भद्रावती पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. सदर कारवाई मिळालेल्या एका गुप्त माहितीवरून भद्रावती पोलिसांनी शहरातील हनुमान नगर येथे केली. सदर सर्व मोटरसायकली भद्रावती पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या असून जप्त केलेल्या या मोटरसायकलींची किंमत चार लक्ष 25 हजार रुपये एवढी आहे.
11 accused who stole a motorcycle were shackled.
एका मोटरसायकल चोरीची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून हनुमान नगर येथील गणेश प्रल्हाद आडे याला ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता विविध गुन्ह्यात त्याने चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील 11 मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. यात हिरो होंडा, पॅशन, ड्रीम युगा, एक्टिवा आदी गाड्यांचा समावेश आहे.सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नो पानी , मार्गदर्शनात,ठाणेदार विपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात शशांक बदामवार यांनी केली. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment