Ads

तालुक्यातील आष्टी (काकडे) परिसरात वाघिणीचा मृत्यू.

भद्रावती जावेद शेख प्रतिनिधी:भद्रावती तालुक्यातील आष्टी काकडे गावातील गावशिवरात एका पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 31 रोज सोमवारला सकाळी उघडकीस आली. सदर वाघीण ही वयस्क असून ती अंदाजे चार ते पाच वर्षाची आहे. विजेच्या स्पर्शाने या वाघिणीचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त होत असला तरी याबाबत अधिकृत माहिती शवाविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मिळेल.Death of tigress in Ashti (Kakade) area of ​​taluka.
सकाळी काही गावकऱ्यांना ही वाघीण मृत्युमुखी पडलेली दिसल्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर भद्रावती वनविभागाच्या चमूने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व वाघिणीचा मृतदेह चंद्रपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास भद्रावती वनविभाग करीत आहे.हा आठवडा जिल्ह्यातील वाघांसाठी घात वार ठरला असून जिल्ह्यात जवळपास तीन वाघांचा मृत्यू या आठवड्यात झालेला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment