Ads

तत्कालीन सचिव-सरपंच यांनी केली चेकबरांज ग्रामपंचायत रेकॉर्डला बोगस घरांची नोंद

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:तालुक्यातील तत्कालीन सचिव, सरपंच यांनी मानोरा गावठाण मध्ये अस्तित्वात नसलेल्या बोगस घरांची ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद केली. मात्र याच ग्रामपंचायती मधील घरे असलेल्या नवीन पिपरबोडीतील १६० प्लॉट सह मालमत्ताधारकांची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला घेण्यात न आल्याने कोळसा खाणीचे प्रकल्पग्रस्त म्हणून मोबदला मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. यावरती तात्काळ कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मुख्य कार्यपालनअधिकारी यांना दिले आहे. सात दिवसात कार्यवाही न केल्यास न्यायालयात दाद मागू असे आयोजित पत्र परिषदेत माजी ग्रामपंचायत सदस्य शंकरय्या गुरय्या कॉलनीडी यांनी सांगितले. Secretary-Sarpanch registered the bogus houses in the Checkbaranj Gram Panchayat records
चेकबरांज ग्रामपंचायत मध्ये मानोरा गावठाण, जुनी पिपरबोडी, नवीन पिपरबोडी हे तीन वार्ड कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीकरिता अधिग्रहित करण्यात आला आहे. या भागाचे पुनर्वसन होत असल्याने ज्यांच्या घराची ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद आहे. त्यांनाच त्याचा मोबदला मिळेल. या ठिकाणी तत्कालीन सरपंच संजय डोंगे,सचिव एम. एस. येवले यांनी अस्तित्वात नसलेल्या घरांची सन २००९-१० आणि २०१०-११ या कालावधीत १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्रानुसार ग्रामपंचायतच्या नमुना ८ मध्ये नोंद केली. दर ४ वर्षांनी केल्या जाणारा सर्वे प्रत्यक्ष न करता मागील नमुना ८ नुसारच लिहिला जात आहे. मात्र नवीन पिपरबोडी येथे सर्वे नंबर ८५/२ मध्ये ५६ घरे, ८६/२ मध्ये ३५ घरे आणि ८८/२ मध्ये असलेल्या ७५ प्लॉट पैकी ८ घरे अस्तित्वात असून सुद्धा नमुना ८ मध्ये नोंद घेण्यात आली नाही. वास्तविक पाहता ही घरे १९८५-८६ च्या काळात तयार झाली. ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद नसल्याने प्रकल्पग्रस्त म्हणून मिळणारा मोबदल्यापासून हे मालमत्ताधारक वंचित आहे. मात्र ज्यांची घरेच अस्तित्वात नाही त्याचा त्यांना लाभ मिळणार आहे. याबाबत १४ डिसेंबर २०१४ पासून पुराव्यासह संबंधित अधिकारी वर्गांना अनेक निवेदने देण्यात आली. दिनांक १४ ऑक्टोबर २०१७ ला पंचायत समिती विस्तार अधिकारी यांचे कडून प्राथमिक चौकशी अहवाल आणि अभिप्रायानुसार तत्कालीन सचिव एम. एस. येवले म्हटले आहे. फसवणूक केल्याप्रकरणी दिनांक ३० जुलै २०२२ आणि १३ मार्च २०२३ ला पोलिसात संबंधित सरपंच, सचिवाचे विरोधात तक्रार दाखल केली. याच आशयाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा देण्यात आली परंतु त्यावर कोणत्याच प्रकारे कारवाई करण्यात आली नाही. यावरून यात सर्वच जण लिप्त असल्याचे स्पष्ट होते. असा आरोप यावेळी शंकरअण्णा कॉलनीडी यांनी केला.
या प्रकरणावर मुख्य कार्यपालन अधिकारी जर ७ दिवसात निर्णय घेत नसेल तर इतर दोषींसह त्यांचेवरही कार्यवाहीसाठी न्यायालयात दाद मागू असा इशारा शेवटी देण्यात आला. यावेळी विजय वानखेडे, आनंदराव सुक्का, जयकुमार सुक्का, श्रीनिवास बोक्का, राजेश किल्लन, बाला मेडबलमी, माणिक सिनु, विजय सपकाळ आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment