Ads

*स.पो.नि.लिंगाडे साहेब यांच्या कार्याला सलाम.

घाटंजी (तालुका प्रतिनिधी ) :
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय"खर तर हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. समाजात सज्जनांच संरक्षण तर दुर्जनांचा खात्मा आज परत लिंगाडे साहेब व त्यांच्या सहकारी टीम कडून बघायला मिळाले. Salute to the work of Assistant Inspector of Police Lingade
घाटंजी येथे शिकत असलेल्या काही मुली मोहरम साठी आपल्या गावी निघाल्या. पण क्षणात आज होत्याच न्हवत झालं होत. वरुण राजाने परत आज धो धो धुतला. क्षणात नदी नाले एक झाले. पावसाने हाहाकार माजवला. व पाण्याने आपल रूद्र रूप धारण केलं. त्यात निसंकोच पणाने मोहरम साठी आपल्या घरी जात असलेल्या मुली, वाघाडी नदीच्या पुराच्या मुळे सर्व ठिकाणी पाणी जमल्याने त्या तडाख्यात सापडल्या. कुर्ली व राजापेठ येथील या मुली दातपाडी या गाव लगतच्या पुलाजवळ पुरा मुळे भवऱ्यात रोकल्या. तेवढ्यात कर्तव्यदक्ष स.पो.अधिकारी लिंगाडे साहेब तसेच त्यांचे सहकारी जमादार लखन राठोड अविनाश मुंडे स्वप्नील सलाम, महिला पोलिस शिपाई रंजनाताई जयश्रीताई व चालक राहुल राठोड यांनी त्या मुलींना त्या विळख्यातून काढले.
त्यांना आपल्या पोलीस गाडीत घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून त्यांची नाश्ता चहा पाणी देऊन, मुलींच्या घरी संपर्क करून दिले. व जबाबदारी पूर्वक त्यांना आपल्या वाहनात घेऊन घाटंजी येथे त्यांच्या हॉस्टेल तसेच खाजगी रुमांवर सोडून दिले.
आज परत पोलिसांच्या वर्दीतील जिवंत माणूस बघायला मिळाला. या कार्यासाठी पारवा पोलिस स्टेशन व स.पो नि लिंगाडे साहेब यांचे खूप खूप अभिनंदन.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment