(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- तहसिल कार्यालय सिंदेवाही येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक आज अध्यक्ष कमलाकर सिध्दमशेट्टीवार संजय गांधी निराधार अनुदान समिती सिंदेवाही यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संजय गांधी निराधार/श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने अंतर्गत अर्जदारांकडून प्राप्त अर्जाची छाननी करुन 138 लाभार्थ्याचे प्रकरणे मंजुर करण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार व्यक्तींना अर्थसहाय्य दिले जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 35 प्रकरणे मंजुर करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान विधवा योजनेअंतर्गत प्राप्त 6 प्रकरणे मंजुर करण्यात आली. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने अंतर्गत प्राप्त 65 प्रकरणे मंजुर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजने अंतर्गत प्राप्त 32 प्रकरणे मंजुर करण्यात आली.
या बैठकीला संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष कमलाकर सिध्दमशेट्टीवार सिंदेवाही अशासकीय सदस्य छाया गणेश हाडगे, प्रेमकुमार डेंगे, अरुण सहारे, नथ्थु मेश्राम, राजु नंदनवार, देवराव कोठेवार, किशोर भरडकर, तुळशीराम गायकवाड,
शासकीय सदस्य योगेश शिंदे तहसिलदार सिंदेवाही , सदस्य दत्तात्रेय धात्रक नायब तहसिलदार सिंदेवाही तसेच नायब तहसिलदार . मंगेश तुमराम संगायो अधिकारी व ईत्यादी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

0 comments:
Post a Comment