Ads

साप -मानव संघर्ष टाळण्याकरिता योग्य उपाययोजना करणे आवश्यक- रत्नाकर पचारे

राजुरा 21 ऑगस्ट:-स्थानिक आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे राष्ट्रीय हरित सेना विभाग, स्काऊट -गाईड युनिट, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती शाखा राजुरा, जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहुद्देशीय संस्था, राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने नागपंचमी निमित्य सापांबाबत अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.Adequate measures must be taken to avoid snake-human conflict.
- Ratnakar Pachare
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारीपुत्र जांभुळकर, मुख्यध्यापक, आदर्श हायस्कुल यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका, आदर्श प्राथमिक, किरण हेडाऊ -कोल्हापुरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संदीप आदे, नागपूर विभाग सचिव, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती तथा उपाध्यक्ष, जीवनदिप संस्था, रत्नाकर पचारे, सचिव, जीवनदिप संस्था, विजय पचारे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती, मनोज कोल्हापुरे,चंद्रपूर जिल्हा सचिव , राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती,अमर पचारे, राजुरा तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती, रुपेश चिडे, स्काऊट युनिट लीडर, रोशनी कांबळे, गाईड युनिट लीडर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले, स्काऊट युनिट लीडर यांनी केले तर आभार रुपेश चिडे यांनी मानले.
यावेळी उपस्थित मार्गदर्शक रत्नाकर पाचरे यांनी साप -मानव संघर्ष टाळण्याकरिता योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. याकरिता सापांची माहिती प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहचविली पाहिजेत. विजय पचारे यांनी विषारी, निम विषारी व बिन विषारी सापांची माहिती चार्ट च्या माध्यमातून सांगितली. संदीप आदे यांनी साप चावल्यावर प्रथमोपचार कसा करावा याविषयी माहिती दिली. मनोज कोल्हापुरे यांनी उपस्थित विध्यार्थीनी विचारलेल्या विविध प्रश्नाची चर्चेच्या माध्यमातून उत्तरे दिली. तसेच सापांबाबत असलेल्या अंधश्रद्धा यावर विस्तृतपणे माहिती सांगितली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सापांबद्दल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनबाबत जनजागृती करण्यात आली. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेअंतर्गत राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीने साप- मानव संघर्ष टाळण्याकरिता विषारी, निम विषारी व बिन विषारी सापांची माहिती, प्रथमोपचार, सर्पमित्रांचे संपर्क असे ब्यानर तयार करून नागरिकामधे जनजागृती केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment