Ads

भद्रावती पोलीसाची धडाकेबाज कारवाई जुगार अड्ड्यावर धाड.

भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख : crime news   मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरू असलेल्या जुगारावर धाड मारीत जुगार खेळणाऱ्या पाच आरोपींना भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे शशांक बदामवार यांना बरांज तांडा जंगल परिसरातील जुगार खेळ होत असल्याची माहिती मिळाली . या कारवाईत चार मोटरसायकल व नगदी 30,000 रकमेसह एकूण तीन लाख 12 हजार900 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. Bhadravati police's daring operation raided gambling dens.
ताब्यात घेण्यात आलेल्या पाच आरोपींवर विविध गुन्हे दाखल करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. बरांज तांडा जंगलपरिसरातील जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करीत घटनास्थळावर धाड टाकली असता तेथे पाच व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून नगदी रोख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात यांच्या नेतृत्वात शशांक बदामवार , अनुप आष्टणकर , विश्वनाथ चुदरी , निकेश ढेंगे जगदीश झाडे आदींनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment