Ads

जुनाड येथील वर्धा नदीत बुडालेल्या भद्रावती येथील दोन तरुणांचे मृतदेह आढळले.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :वनी तालुक्यातील जुनाड येथील वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोघांचेही मृतदेह पाण्यातून काढण्यात शिरपूर पोलिसांना दिनांक 16 रोज बुधवार ला यश आले. Bodies of two youths from Bhadravati who drowned in Wardha river in Junad were found.
रितेश नत्थु वानखेडे व आदर्श देवानंद वारनाडे राहणार भद्रावती अशी या मृतकांची नावे आहेत. 15 ऑगस्ट च्या दिवशी . दरम्यान नदीवरील पुलावर बसले असताना त्यांना पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे ते नदीत पोहायला उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी शोधकार्य सुरू केले असता त्यांचे मृतदेह घटनास्थळाजवळच नदीत आढळून आले. या घटनेमुळे भद्रावती शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment