(प्रशांत गेडाम) सिंदेवाही- महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी, सिंदेवाही, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही व तालुका अभियान व्यवस्थापक सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन पंचायत समिती, सिंदेवाही येथील सभागृहात करण्यात आलेले होते.
सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही कावळे, श्रीमती अर्चना फुलसुंदर उपविभागीय कृषी अधिकारी नागभीड, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय योगेश शिंदे तहसीलदार सिंदेवाही, डॉ. नागदेवते वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र , तीतरे मॅडम सहाय्यक गट विकास अधिकारी सिंदेवाही, महाले तालुका कृषी अधिकारी, नागरे उमेद अभियान व्यवस्थापक तसेच कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही व तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील महिला, शेतकरी गट
उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना रानभाजी प्रदर्शन व विक्री व्यवस्थापन, मूल्यवर्धन इ विषयी तसेच केवायसी करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
तसेच रानभाजी महोत्सवामध्ये सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
0 comments:
Post a Comment