Ads

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड.

भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख :- crime news मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरू असलेल्या जुगारावर धाड मारीत जुगार खेळणाऱ्या दहा आरोपींना भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले. Police raid on gambling den.
सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे शहरातील सुमठाना परिसरातील एका घरात करण्यात आली. या कारवाईत मोबाईल, मोटरसायकल व नगदी रकमेसह एकूण चार लक्ष 97हजार,870 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या 10 आरोपींवर विविध गुन्हे दाखल करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. सुमठाना परिसरातील एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करीत घटनास्थळावर धाड टाकली असता तेथे दहा व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून नगदी रोख 30हजार670 रुपये, आठ मोबाईल व पाच मोटरसायकली असा 4 लक्ष 97हजार,870 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किटे यांच्या नेतृत्वात अंमलदार शशांक, अनुप, विश्वनाथ, निकेश व योगेश आदींनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment