Ads

वर्षा कोयचाळे राज्यस्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण

राजुरा 1 ऑगस्ट:महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना आयोजित राज्यस्तरीय तांत्रिक अधिकारी व पंच परीक्षा नुकतीच दिनांक 22 जुलै ते 26 जुलै 2023 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेला विविध जिल्ह्यातील पात्रता धारक पंच सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे कुमारी वर्षा छबन कोयचाळे यांनी स्टार थ्री म्हणजेच तिसऱ्या स्तरावरील उच्चतम परीक्षा उत्तीर्ण केली आहे.Varsha Koychale State Level Referee Exam Passed
वर्षा कोयाचाळे या राजुरा तालुका बॉक्सिंग संघटनेचा कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, राजुर्यातील सामाजिक व क्रीडा संघटनेत सक्रिय कार्य करीत आहे. राजुरा तालुक्यातील आदिवासी भागातून तसेच चंद्रपूर जिल्हाचा इतिहासात प्रथमच महिला पंच इतक्यावरील स्तरावर परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. वर्षा कोयाचाळे यांच्या यशाबद्दल राजुरा तालुका बॉक्सिंग संघटने तर्फे अध्यक्ष श्री हरिश्चंद्र वीरुटकर, उपाध्यक्ष श्री प्रकाश पचारे, सचिव कु. पूर्वा खेरकर, श्री किशोर चिंचोलकर, संगीता नाकाडे, मयूर खेरकर तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बादल बेले, नागपूर विभाग अध्यक्ष विजय जांभूळकर, नागपूर विभाग सहसचिव संतोष देरकर, कू. उषा करडभुजे व क्रीडा प्रेमी यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment