Ads

दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या सोन साकडी लंपास केले

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेल्याची घटना शहरातील गवराळा येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिरात घडली.The gold Chain of the woman who came for darshan was looted
चोरीला गेलेल्या 15 ग्रॅमच्या सोन्याच्या चेनची किंमत 70 हजार रुपये एवढी आहे. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सदर मंदिरात भाविकांची गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. शहरातील सुमन दत्तात्रय हेपट ही महिला सुद्धा मंदिरात दर्शनासाठी आली होती.दर्शनासाठी लाईन मध्ये ती उभी असताना मागे असलेल्या एक दोन स्त्रिया त्यांना समोर जाण्यासाठी धक्का देत होत्या. या संशयित महिलांनीच ही चोरी केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. बाहेर निघाल्यानंतर आपली चेन चोरीला गेल्याचे त्यांना लक्षात आले. त्यानंतर लगेच पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते लगेच मंदिरात पोहोचले. त्यांनी शोधाशोध केल्यानंतरही त्या संशयित महिला आढळून आल्या नाही.भद्रावती पोलीस या अज्ञात महिला चोरट्यांचा शोध घेत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment