Ads

शेतात विज पडून एक महिला ठार ;तर एक जखमी

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :-सिंदेवाही तालुक्यातील वासेरा जवळील मौजा सिरकाडा येथील काही महिला प्रदीप यादव बोरकर रा. सिरकाडा यांच्या शेतात निंदन काढण्यासाठी गेले. मात्र निसर्गात अचानक बदल होऊन वीज कडकडाटा सहित पाण्याने रुद्र रूप धारण केल्याने महिला घराकडे जाण्यासाठी निघाले असता वीज पडून सौ. महानंदा मोतीराम अलोणे (मयत ) रा. सिरकाडा या जागीच ठार झाल्या त्यांचे अंदाजे वय 64 वर्ष असल्याचे समजते तर सौ. रोषणा प्रफुल गेडाम (जख्मी ) रा. सिरकाडा वय अंदाजे 35 वर्ष या गंभीर जख्मी झाल्याने
A woman was killed and another injured due to lightning in a farm in Sirkada
त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलवले असून त्यांची प्रकुर्ती गंभीर असल्याचे समजते.ही घटना आज बुधवार दिनांक 20/9/2023 ला ठीक दुपारी 1 वाजे च्या दरम्यान घडली.
तत्पूर्वी या घटनेची माहिती पोलीस प्रशासन , महसूल प्रशासन सिंदेवाही ला कळवले असता तलाठी दुधकुरे मंडळ अधिकारी परचाके तसेच सिंदेवाही पोलीस विभागातील मा. बिट अमलदार बावणे सर तसेच नागदेवते साहेब हे उपस्थित झाले असून पुढील तपास प्रशासन करीत असल्याचे समजले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment