Ads

13 फुट लांबीचा अजगर सापाला सर्पमित्राने दिले जीवनदान

बल्लारपुर :-दिनांक 28 आक्टोंबर 2023 ला बल्हारपुर शहरातील पंडीत दिनदयाल बार्ड येथील रहिवासी श्री. शेरा सुर्यवंशी यांचे राहते घरी विशाल अजगर साप असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली. माहिती प्राप्त होताच बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कर्मचारी हे मौका स्थळी तात्काळ हजर झाले व सर्पमित्र श्री ओम प्रकाश चव्हाण व श्री सुनील जयस्वाल यांचे मदतीने अजगर या प्रजातीचे सापाला पकडून बल्हारशाह नियतक्षेत्रातील वनखंड क्रमांक 493 मध्ये निसर्ग मुक्त करण्यात आले.
A 13 feet long python snake was given life by a snake charmer
रेस्क्यु करण्यात आलेला अजगर हा 13 फुट लांबीचा होता. याकामी श्री. के. एन. घुगलीत, क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह, श्री. एस. एम. बोकडे, नियवनरक्षक बल्हारशाह, श्री. नितेश बावणे, सर्पमित्र श्री ओम प्रकाश चव्हाण व श्री. सुनील जयस्वाल यांनी परिश्रम घेतले त्यामुळे अजगर या सापाला नविन जिवनदान मिळाले व त्याला बनात निमर्ग मुक्त करण्यात आले.

दिनांक 27 आक्टोंबर 2023 ला मौजा फेम तुकुम गावा लगतील श्री. विठ्ठल बाबुराव कुळमेथे यांचे शेतात अजगर साप दिसुन आला. त्याला सर्पमित्र अखिल लभाने याचा मदतिने पकडुन बनखंड क्रमांक 496 देव बोडी परीसरात निसर्ग मुक्त करण्यात आले. रेस्क्यु करण्यात आलेला अजगर हा 6 फुट लांबीचा होता. याकामी सपमित्र अखिल लभाने, कु. उपा ए.घोडवे, नियतवनरक्षक केम, कु.बी. पि. तिवाडे, नियतवनरक्षक लावारी 2 व PRT टिम, केम तुकुम यांनी परिश्रम घेतले त्यामुळे अजगर या सापाला नविन जिवनदान मिळाले व त्याला

वनात निसर्ग मुक्त करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment