Ads

कुख्यात दुचाकी चोराकडुन 7 मोटार सायकल केल्या जप्त

चंद्रपुर :- Crime news चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी - चोरीवर अंकुश लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे, 16 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे एका दुचाकी अट्टल चोराला ताब्यात घेतले, त्याची अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरीचे मोठे घबाड उघडकीस आले.7 motorcycles seized from a notorious two-wheeler thief
  16 ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखा दुसऱ्या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम कमी किमतीमध्ये दुचाकी वाहन विकण्यासाठी बस स्टॅण्ड वर ग्राहक शोधत आहे. मात्र त्या वाहनांचे कागदपत्रे त्याच्याजवळ नव्हते, पोलिसांना संशय आला असता त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पारधीगुळा धोपटाला येथे राहणारा 28 वर्षीय प्रदीप संजय शेरकुरे असे त्या इसमाचे नाव, सदरचे दुचाकी वाहन प्रदीप ने वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, प्रदीप कडून दुचाकी वाहन क्रमांक MH34BC5968 जप्त करण्यात आली.

प्रदीप ने इतर काही गुन्हे केले का याबाबत सखोल चौकशी केली असता वरोरा, गडचांदूर, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील दुचाकी व LED टीव्ही चोरी केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

प्रदीप ने 7 मोटार सायकल व एक टीव्ही चोरी केली होती, आरोपिकडून तब्बल 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, आरोपीला पुढील कारवाईसाठी वरोरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, पोलीस कर्मचारी अतुल डांगे, जमिर पठाण, नितेश महात्मे, प्रसाद धुळगळे, दिनेश अराडे व रुषभ बारसिंगे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment