The body of a tigress was found in a rotten state,
घटणास्थळाची पाहणी केली असता प्राथमिक अंदाजानुसार सदर वाघ (मादि) चा मृतदेह सडक्या अवस्थेत आढळल्याने मृत्युचे नमके कारण है शवविच्छेदन अहवानंतर स्पष्ट होऊ शकेल. सदर मृत वाघ (मादि) चा मृत देह ट्रांझिट ट्रीटमेंन्ट सेंन्टर येथे नेण्यात आला असुन सदर मृत वाघ (मादि) चे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन हे मा. श्री. जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर वनवृत चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री. प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर, मा. श्री. आदेशकुमार शेंडगे सहाय्यक वरसंरक्षक (तेंदु) चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर, श्री. एच. पी. शेंडे वपअ भद्रावती, श्री. व्हि. व्हि. शिंदे, क्षेत्र सहाय्यक भद्रावती, श्री. जे. ई. देवगडे वनरक्षक, चिपराळा, डॉ. रविकांत खोब्रागडे व डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर, त्याच प्रमाणे श्री. बंडुजी धोतरे एन.टि.सी.ए. चे प्रतिनीधी, तथा महाराष्ट्र वन्यजीव मंडळ सदस्य व इतर वनकर्मचारी यांचे उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले व वन अधिकारी यांचे उपस्थीत सदर वाघ (मादि) मृत चे अग्निदहन करण्यात आले. प्राथमिक अंदाज नुसार सदर मृत वाघ (मादि) अंदाजे सहा ते सात वर्ष वयाची असुन सदर वाघ (मादि) चे दात, नखे व मीशा शाबुत आहे.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
प्रकरणी वनगून्हा नोदविण्यात आला असुन पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी भद्रावती हे करीत आहे.
0 comments:
Post a Comment