Ads

भद्रावती पोलिसांची दडपशाही

भद्रावती तालुका प्रतिनिधी
: तालुक्यातील कर्नाटक एम्टा कंपनीतील केपीसीएल याठिकाणी काम करणाऱ्या एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.कंपनी प्रशासनातर्फे सदर मृत कामगाराला आर्थिक मदत देण्याची मागणी केल्या जात होती मात्र मुजोर कंपनी प्रशासनाने मागणी मान्य न केल्याने मृत कामगारांच्या कुटुंबीयांनी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्याशी संपर्क केला असता जिल्हाप्रमुख यांनी आक्रमक भूमिका घेत कंपनी प्रशासनाला जाब विचारला व मृत कामगाराच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपये मदत देण्याची मागणी केली होती. त्यामुळे भद्रावती पोलीस प्रशासनाने शिवसेना जिल्हाप्रमुख यांना बळजबरीने अटक केल्याने भद्रावती पोलिसांची दडपशाही समोर आली आहे.Bhadravati Police's Repression
भद्रावती येथील कर्नाटक एम्टा कंपनीतील केपीसीएल येथे काम करणाऱ्या जितेंद्र रामअवतार कर्णधार वय 36 वर्ष राहणार महाकाली कॉलारी, चंद्रपूर या कामगाराचा दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कंपनी प्रशासनातर्फे सदर कामगाराचा इपीएफ तसेच एएसआयसी भरण्यात आला नाही. तसेच कंपनी प्रशासनातर्फे मृत कामगाराला कुठलीही आर्थिक मदत देण्यात टाळाटाळ करत असल्याने मृत कुटुंबियांच्या परिवारानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्याशी संपर्क केला असता त्वरित ग्रामीण रुग्णालय भद्रावती गाठत. सदर मृत कामगाराचा इपीएफ तसेच इएसआयसी का भरला नाही? याबाबत जाब विचारला तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपये मदत देण्याची मागणी केली होती. मात्र कंपनी प्रशासनाने पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन पळता पाय काढला. त्यामुळे मृत कामगारांच्या कुटुंबीयांचा रोष वाढण्याने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी मृत कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी कंपनीकडे धाव घेतली मात्र पोलीस प्रशासनाने दडपशाही दाखवत त्यांना अटक केली. व कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर मृत कामगारांच्या कुटुंबीयांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन मृत कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी कितपत तत्पर राहील की झाकली मूठ साव्वा लाखाची म्हणून कंपनी प्रशासनाला पाठीशी घालेल हे बघणे आता औचित्याच्या ठरणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment