भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती,रेल्वे खाली कटून एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील भांदक रेल्वे स्टेशन लगत रेल्वे लाईनवर उघडकीस आली. सदर मृत इसमाचा मृतदेह अत्यंत छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आल्याने त्याची ओळख पटविणे कठीण झाले आहे.Death of unknown Man after being cut down by a train near Bhandak railway station.
सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला व ते या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. मृत इसम हा जवळपास 45 ते 46 वयोगटातील असून त्याचे अंगावर काळपट रंगाचा साधा पॅन्ट व पांढुरका काळपट शर्ट आहे. त्याच्या हातावर दिल च्या आकाराचे चिन्ह असून त्या चिन्हात इंग्रजीतील के हे अक्षर लिहिलेले आहे.
या मृतदेहाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी भद्रावती पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन भद्रावती पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment