मुंबई :- राज्याचे मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपूरात आयोजित श्री माता महकाली महोत्सवाच्या Shree Mata Mahakali Festival पहिल्या टिझरची लाँचींग करण्यात आली आहे. काल मुबंई येथे मुख्यमंत्री यांनी सदर डिझरची लाँचींग केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती.Teaser launch of Mahakali Mahotsa by Chief Minister Eknath Shinde
माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरु आहे. 19 ऑक्टोबर पासून महोत्सवाला सुरवात होणार आहे. यासाठी विविध नामांकित कलाकार चंद्रपूरात येणार असून या दरम्यान सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कायक्रमांचे आयोजन नियोजित करण्यात आले आहे. मागच्या वर्षी पार पडलेल्या श्री महाकाली महोत्सवला नागरिकांचा मिळालेला सहभाग लक्षात घेता यंदाचेही महोत्सव भव्य होणार असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री माता महाकाली महोत्सवच्या पहिल्या टिझरची लाँचिंग करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महोत्सवाबाबत आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे. सदर टिझरमध्ये यंदाच्या महाकाली महोत्सवातील आर्कषण दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापुर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांना श्री माता महाकाली महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. यावेळी त्यांनी माता महाकालीच्या दर्शनासाठी महोत्सवा दरम्यान चंद्रपूरात येणार असल्याचे म्हटले आहे.
0 comments:
Post a Comment