भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती शहरा नजीक असलेल्या देऊळवाडा गावाजवळील रेल्वे फाटकाजवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह रेल्वेने कटलेल्या अवस्थेत आढळून आला.सदर घटना दिनांक 10 रोज मंगळवारला दुपारी एक वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा अपघात असावा की आत्महत्या असावी याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरूआहे.
Unknown Man died after being hit by a train near Deulwada railway gate.
देऊळवाडा रेल्वे फाटका जवळील पोल क्रमांक 846 जवळ हा मृतदेह रेल्वेने कटलेल्या अवस्थेत आढळून आला.मृतक व्यक्ती हा साधारणतः 52 ते 55 वयोगटातील असून त्याने कथ्या रंगाची सफारी घातलेली आहे.या सफारीवर परफेक्शन टेलर्स असे टॅग लावलेले आहे. त्यामुळे हा मृत इसम हा शहर तथा परिसरातीलच असावा असा अंदाज आहे. घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना कळतात त्यांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती कारवाई करीत मर्ग दाखल केलेला आहे पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सय्यद हे करीत आहे भद्रावती पोलीस या अज्ञात मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे.

0 comments:
Post a Comment