Ads

रामपूर येथे युवकाची दगडाने ठेचून हत्या

राजुरा : शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीत वॉर्ड क्रमांक दोन साई मंदिर जवळ राहत असलेला संदीप देवराव निमकर (वय २८) या युवकाची रामपुर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना आज सायंकाळी चार वाजता उघडकीस आली.
Rampur youth crushed to death with stones
रामपुर येथे संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. (दि. ९) रोज सोमवारला रात्री आठ वाजता घरून निघून गेला तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची तक्रार घरच्यांनी पोलिस ठाण्यात दिली. तोपर्यंत नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र तपास सुरू ठेवला होता. तो मित्रांसोबत जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोधत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ शोध घेत असताना झुडपात छिनविछिन अवस्थेत मृतदेह पडलेला दिसून आला. घटनेची माहिती राजुरा पोलिस स्टेशन ला दिली असता राजुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी घटनास्थळ गाठून पंचनामा केला यावेळी यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे उपस्थित राहून घटनेचा पंचनामा करून समोरील तपास राजुरा पोलिस करीत आहे.

राजुरा लगत असलेल्या रामपुर या वस्तीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी राजुरा शहरातील नाका नंबर तीन येथे झालेल्या खुनात रामपुर वस्तीत राहणारेच आरोपी होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल चोर, कोळसा चोर व भंगार चोर आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात याठिकाणी जुगार व सट्टा चालतो यामुळे येथील युवक यामध्ये गुटले असून यावर वेळीच आवर न बसल्यास यासारख्या घटना पुन्हा गडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रामपुर येथिल मृत संदीप निमकर यांच्या घराशेजारी असलेल्या साई मंदिर समोर मोठ्या प्रमाणत अवैद्य काम सुरू असून जुगार व सट्टा पट्टी मोठ्याप्रमानात चालतो तर माथरा रोड वर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याजवळ बस स्थानकात मोठ्या प्रमाणात कोळसा, डिझेल चोर व जुगाराचा अड्डा चालतो.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment