Ads

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पाच हजार नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड चे वितरण

चंद्रपुर :-नागरिकांना उपचारासाठी पाच लाखांपर्यंत शासकिय मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येत आहे. यात जनगणना यादीत समाविष्ट असलेल्या जवळपास पाच हजार नागरिकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सदर योजनेचे कार्ड वितरीत करण्यात आले आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात सदर कार्ड वाटप सुरु असुन नोंदणीकृत नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
Distribution of Ayushman Bharat Card to five thousand citizens on behalf of Young Chanda Brigade
केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान जन-आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेमूळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येणार आहे. केंद्र सरकारने ही योजना 23 सप्टेंबर, 2018 रोजी सुरु केली होती. या योजनेत किरकोळ उपचारापासून ते शस्त्रक्रियेचा लाभ रुग्णांना घेता येता येणार आहे. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतो. सदर योजने अंतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत रुग्णांचा खर्च सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे.
2011 च्या जनगणना यादीत समाविष्ट असलेल्या नागरिकांची सदर योजनेसाठी नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीकृत पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरीत करण्याचा उपक्रम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राबविण्यात येत आहे. 5 ऑक्टोबर पासून जैन भवण जवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात सदर उपक्रम राबविल्या जात असून मागील एक महिण्यात पाच हजाराहून अधिक नागरिकांना कार्ड वितरित करण्यात आले आहे. सदर उपक्रम पूढील एक महिणा चालणार असून नोंदणीकृत नागरिकांनी कार्यालयात सुरु असलेल्या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment