Ads

आजी आजोबा सोबत रमले बालगोपाल. बालगोपालांसोबत घेतला खेळांचा मनसोक्त आनंद. - नाताळ सणाचे केले आयोजन

राजुरा 25 डिसेंबर:-राजुरा येथील उपक्रमशील शाळा म्हणून ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल ही नावारूपास आली आहे. विध्यार्थीचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता या शाळेतील शिक्षक नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम प्रात्यक्षीकाद्वारे मुलांचा प्रत्यक्ष सहभागाने घेतात.
Childrens had fun with his grandparents. Enjoyed the games with Childrens.
Organized the Christmas festival
या उपक्रमात शाळेचे सल्लागार संदीप मालेकर आणि जयश्री मालेकार व केंद्र संचालक ॲड. मनोज काकडे व ब्रांच इन्चार्ज शुभांगी धोटे यांच्या मार्गदर्शनात शाळेतील सहाय्यक शिक्षिका अलिया शेख, अलिशा सय्यद, प्रीती, पूजा ईटणकर यांच्या नेतृत्वात विध्यार्थीना शिक्षणाची गोडी लावत विविध उपक्रम घेतात. या उपक्रमात मुलांसोबत आजी - आजोबांनी विविध खेळांचा आनंद घेतला. तसेच सदर कार्यक्रमात आजी - आजोबा मुलांना जे संस्कार देतात त्याची सुद्धा स्तुती करण्यात आली. शाळेत झालेल्या कार्यक्रमांत मूल सुद्धा आजी आजोबा सोबत रमून गेले व अतिशय आनंदात त्यांनी खेळात भाग घेतला. या उपक्रमाला पालकवर्गानी सहकार्य केले व विध्यार्थी सुद्धा सुंदर वस्त्र परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच नातळ सण सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध खेळ, सण समारंभ साजरे करणे, शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम घेणे आदिच्या माध्यमातून विध्यार्थीचा सर्वांगीन विकास साधण्याचा प्रयत्न या शाळेत केला जातो. या उपक्रमास ममता व अर्चना या मदतनिस यांनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment