Ads

सायतखर्डा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम

घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे उद्धार करते , क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 133 वी पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त दिनांक 3 डिसें 2023सायतखर्डा येथे अभिवादन कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक संघपाल कांबळे( ता. अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कार्यक्रमाचे अध्यक्ष हीरेश्वर गुरनुले अध्यक्ष महात्मा फुले पुतळा समिती हे होते, Death anniversary felicitation program of Krantisurya Mahatma Jyotirao Phule at Sayatkharda
प्रमुख उपस्थिती पांडुरंग निकोडे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कैलास मुनेश्वर सरपंच राजेश निकोडे प्रा. अंगिरस निबुदे( प्रमुख वक्ते) गजानन लेनगुरे (ग्रा.पं सदस्य) तुकाराम लेनगुरे( सोसायटी अध्यक्ष) शेषराव जाधव (सोसायटी उपाध्यक्ष) ताणबाजी आडे (तंटामुक्ती अध्यक्ष) प्रभाकर देशमुख (पोलीस पाटील) संतोष मोहूलै ( शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) विलास मांदाडे (ग्रा. पं सदस्य) सदाशिव ठाकरे ज्येष्ठ मान्यवर रघुनाथ शेंडे, रघुनाथ मोहरले इत्यादी हजर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला सुद्धा पूजन करून वंदन करण्यात आले .यावेळी सायतखर्डा येथील शेकडो नागरिक हजर होते. अभिवादन कार्यक्रमानंतर राष्ट्र निर्माण विचारधारा मंच घाटंजी च्या वतीने संगीतमय प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक गजेंद्र ढवळे व त्यांचे सहकारी हजर होते. सदर कार्यक्रमानंतर रात्री दहा वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारावर आधारित भजना चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी कार्यक्रम आयोजन समिती तथा समस्त ग्रामवाशी सायतखर्डा यांच्या वतीने करण्यात आला होता.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment