Ads

मूल तालुक्यात कराटे प्रशिक्षण शिबिर आणि स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

मूल (नासिर खान):-जुंसेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया (JSKAI) च्या महाराष्ट्र यूनिट चे एक पाऊल पुढची ट्रेनिंग आणि संलग्नित सर्व चमू च्या आपसांतील मेलजोल तथा उत्कृष्ठ-आशादायी खेळाडूंची ओळख करने आणि असोसिएशन मध्ये मोठ्या संख्येत असे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही वार्षिक निवासी कराटे प्रशिक्षण शिबिर आणि स्पर्धा जुंसेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (JSKAM) च्या छत्रछायेत तालुका कराटे-डो असोसिएशन मूल द्वारे ह्या वर्षी सोमनाथ (श्रम संस्कार छावनी) मध्ये 23 से 25 डिसेंबर 2023 ह्या कालावधीत आयोजित केले होते । ज्यामध्ये असोसिएशन ला संग्लनित यवतमाळ,वर्धा,गढ़चिरोली आणि चन्द्रपुर जिल्ह्यातून ५ कराटे क्लब च्या खेळाडू आणि प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता।
Karate training camp and competition successfully concluded in Mul
हे प्रशिक्षण शिबीर जूँसेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया (JSKAI) चे राष्ट्रीय प्रमुख शिहान विनय बोधे सर (6th दान ब्लैक बेल्ट) यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले.ह्या शिबिरात तीन दिवसाच्या दिनचर्येत रोज तीन कराटे ट्रेनिंग सत्र (अध्यवत नियम आणि तांत्रिक स्पष्टता सह) आणि दुपार तथा संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते,ज्यात प्रतिदिन चित्रकला,वेशभुषा,नृत्य,शोर्ट मैराथॉन स्पर्धा इत्यादी समाविष्ट होत्या.शिबिराच्या अंतिम दिवशी (25 डिसेंबर) कराटे कुमिते आणि काता चैंपियनशिप चे आयोजन केले गेले होते ज्यात सर्व खेळाडूंनी सहभाग घेत पदक प्राप्त केले.अंतिम संध्या ला सर्व खेळाडूंना सर्व आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित सर्व प्रशिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराला पूर्णतः यशस्वी बनविण्याकरिता शिहान विनय बोधे तथा प्रशिक्षकांमध्ये रवी मुक्के,अविनाश बोंडे,संजय कोल्हे,जितु साकपेलीवार,जयंती मंडेला,इमरान खान,मुहाफिज सिद्दीक़ी,निलेश गेडाम,शाहबाज़ शेख,मनजीत मंडल,नरेश थटाल,वृषभ सावसाकड़े ह्यांचे योगदान सकारात्मक आणि अमूल्य होते. शिबिरात साहिल खान,हर्ष रोहणकर,अमान ख़ान,प्रतीक मशाख़ेत्री,साक्षी गुरनुले,कुणाल पेशट्टीवार,आर्थिका उपाध्याय,भार्गव मेहता,नैतिक धोबे,दिव्या नरड,धरती भोयर ह्यांनी शिबीराची व्यवस्था नियोजित वेळापत्रकानुसार चालण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.शिबिर समापन कार्यक्रमात शिहान विनय बोढे आणि आलेल्या सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे तालुक़ा कराटे डो असोसिएशन चे अध्यक्ष इम्रान ख़ान आणि उपाध्यक्ष निलेश गेडाम ह्यांनी आभार व्यक्त करत खेळाडूंना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment