Ads

सामाजिक एकोपा जपणारा दत्त जयंती उत्सव

चंद्रपूर:नागपूर रोडवरील नानाजी नगर येथील सार्वजनिक दत्त मंदिरात स्थानिक नागरिकांनी दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे भव्य आयोजन केले होते.दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सार्वजनिक दत्त मंदिराच्या पटांगणात आयोजित या महाप्रसाद कार्यक्रमाचा शहरातील दत्ताच्या हजारो भक्तांनी लाभ घेतला.Dutt Jayanti Utsav which preserves social harmony
येथील दत्त जयंती उत्सवाला 51 वर्ष पुर्ण झाले. वडगाव येथील दिवंगत फकीराजी पाटील येरगुडे यांनी सार्वजनिक दत्त मंदिराची स्थापना केली होती. मंदिराच्या स्थापनेपासून दरवर्षी स्थानिक नागरिकांतर्फे दत्त जयंती व महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात येते. शहरातील हजारो भक्त या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने दत्त जयंती निमित्त उपस्थिती दर्शवितात. यावर्षी सुद्धा दत्त जयंती व महाप्रसादा निमित्त हजारो भक्तांनी हजेरी लावली. या निमित्ताने नानाजी नगरच्या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. प्रत्येक वृक्षाची रंग-रागोटी करण्यात आली. श्री दत्ताच्या गीतांनी दोन दिवस संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.सजावटीमुळे श्री दत्ताचे भव्य मंदिर सुद्धा देखणे झाले होते.
दत्त जयंती व महाप्रसाद कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता
नानाजी नगर महिला मंडळ, नवदत्त क्रीडा व युवक मंडळ, दत्तनगरचे नवयुवक बाल गणेश मंडळ, लक्ष्मी नगर परिसरातील साईनगर, साईबाबा मंदिर परिसर, नानाजी नगर परिसरातील युवक-युवती व सर्व नागरिक तसेच जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

ब्लाॅक
1971 च्या दरम्यान हा परिसर ग्रामपंचायतचा भाग असताना दत्त जयंती उत्सवाला सुरू झाली. आपल्याकडच्या ग्रामीण परंपरेप्रमाणे सर्व समाजाचे लोक एकत्रित येऊन दत्ताच्या भक्तांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. 51 वर्षानंतरसुध्दा ही परंपरा कायम आहे. यावर्षी आयोजन समितीमध्ये हिंदू बांधवासह दोन मुस्लिम व अनेक बौद्ध बांधवांचा समावेश होता. दत्त जयंती निमित्त सामाजिक एकोपा जपण्याची परंपरा कायम आहे.
पप्पू देशमुख
मुख्य संयोजक
दत्त जयंती व महाप्रसाद कार्यक्रम.



Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment