घाटंजी प्रतिनिधी:-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर तर्फे घेण्यात आलेल्या MBA ( द्वितीय वर्ष ) हिवाळी - २०२३ चा चौथ्या सेमिस्टरचा निकाल नुकताच जाहीर झाला.
त्यामध्ये घाटंजी येथील रहिवासी आणि सध्या नागपूर येथे कृषी विपणन क्षेत्रात कार्यरत असलेले कविश उद्धवराव सिसले, हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
त्यांनी द्वितीय वर्षात विपणन व्यवस्थापन आणि मानव संसाधन व्यवस्थापन ( Marketing Management & Human Resource Managent ) या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.
एप्रिल २०१० यावर्षी सुद्धा त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचेतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी विशेष प्रविण्यासह यश संपादन केले होते हे येथे उल्लेखनीय.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष आणि नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षात मिळालेल्या या यशाचे श्रेय त्यांनी संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य, सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मित्र मंडळींना दिले.
0 comments:
Post a Comment