Ads

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या २०२३ च्या वार्षिक विशेषांकाचे ऊर्जानगरात विमोचन

चंद्रपूर:- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या वार्षिक विशेषांक २०२३ चे विमोचन चंद्रपूर जिल्हा व ऊर्जानगर शाखेच्या वतीने महाराष्ट्र अंनिस चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मनोरंजन केंद्र ऊर्जानगर चंद्रपूर येथे मा.डाँ. संगिता बोदलकर वैद्यकीय अधिक्षक चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र दवाखाना, जिल्हा कार्याध्यक्ष पी एम जाधव, मा.नरेंद्र रहाटे सर उपाध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन तथा कामगार नेते यांचे हस्ते तसेच जिल्हा प्रधान सचिव नारायण चव्हाण साहेब,कविता नवघरे जिल्हा महिला सह कार्यवाहक तसेच ऊर्जानगर शाखेचे अध्यक्ष मुरलीधर राठोड, कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर प्रधान सचिव,विजय राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
Release of the 2023 Annual Special Issue of Andhasraddha Nirmulan Pahitka in Urja Nagar
यावेळी डाँ संगीता बोदलकर यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि खास करून घरच्या महिला या अंधश्रद्धेला कशा बळी पडतात यावर विस्तृत मार्गदर्शन करून अंनिस शाखा ऊर्जानगरच्या कार्याचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव कोंडेकर यांनी केले ,प्रास्ताविकेतून सदर विशेषांकाचे महत्व नारायण चव्हाण यांनी विशेद केले तर आभार मुरलीधर राठोड यांनी मानले यावेळी अंनिस ऊर्जानगरचे पदाधिकारी बाळकृष्ण सोमलकर, दुरेंद्र गेडाम ,संजय जुनारे, शंकर दरेकर,तुषार चव्हाण,मनोज रायपुरे,सुजित जुनगरे, मनोजकुमार चहांदे, सुरेश निमकर्डे व अन्य सभासद यांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment