वढोली(वार्ताहर):-तालुक्यातील कुलथा रेतिघाट तस्करांनी पोखरून काढला असून रात्रभर पोकलेन च्या साहाय्याने रेती काढणे सुरू असताना अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसत आहे. तस्करांनी एकच धुमाकूळ घातला असून अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी सुरू असल्याचे बोलले जात आहे.Sand smuggling in Gondpipri with the blessings of authorities...?
गोंडपिपरी तालुक्यात उत्तम दर्जाचा रेती साठा असून नद्यांमधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करून दुसऱ्या राज्यात देखील रेतीची वाहतूक होताना दिसत आहे.रेती तस्कर खुलेआम रेतीची वाहतूक करताना आढळत असून मोठे माफिया तयार झाले आहे.घाटाशेजारी हजारो ब्रास रेती साठा रात्रभरात जमा होतो अचानक गायब होतो.पुन्हा आढवडा भरात रेतीचे ढिगारे जसेच्या तसे दिसत असतात.
अनेक माणसे घाटापासून ते गोंडपिपरी पर्यंत अधिकाऱ्यांवर नजर ठेवले असतात. कुलथा घाटाकडे सामान्य नागरिक शेताकडे जाताना आढळल्यास त्यांना घेराव घालून चौकशी करतात व सोडतात त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत असून रात्रीच्या वाहतुकीमुळे घाटाशेजारील गावकऱ्यांची झोप मोड होत असून झोपी गेलेल्या स्थानिक अधिकाऱ्यांना जाग येईल का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.
पोकलेन,जेसीबी द्वारे नदी घाट पोखरल्या जात आहे. ही गंभीर बाब असून याचा पर्यावरणाचा देखील रास होणार आहे . रात्रभर वाहतूक गोंडपीपरी मार्गे सुरू असल्यामुळे वाहतूकी दरम्यान जंगल परिसर असल्याने वन्य प्राण्यांचा जीव देखील धोक्यात आलेला आहे. ही गंभीर बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात न येणे हे शंकास्पद आहे स्थानिक अधिकाऱ्यांची रेती तस्करांची हात मिळवणी झाली असावी.जिल्हास्तरावरील वरिष्ठांनी तात्काळ पोकलेन जेसीबीने रेती काढण्यासाठी निर्बंध आणावे कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू
-सुरज माडूरवार शिवसेना तालुकाप्रमुख गोंडपिंपरी
0 comments:
Post a Comment