Ads

सुजाण नागरिक निर्मिती हेच स्काऊट गाईड चे ध्येय.- आमदार किशोर जोरगेवार

राजुरा 30 जानेवारी:-भारत स्काऊट्स आणि गाईडस जिल्हा कार्यालयाच्या वतीने दि.२९ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत संध्या स्मृती विहार पद्ममापूर ता. जी. चंद्रपूर येथे स्काऊट्स गाईड्स जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 जानेवारी ला कार्यक्रमाचे थाटात उदघाटन झाले.
The aim of Scout Guide is to create intelligent citizens.
- MLA Kishore Jorgewar
कार्यक्रमाचे उदघाट्क म्हणून किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र चंद्रपूर यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सूर्यकांत खणके, माजी मुख्यालय आयुक्त स्काऊट यांची तर प्रमुख अतिथी म्ह्णून रामपाल सिंग, अध्यक्ष, नियामक मंडळ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर, दिलीप वावरे, अध्यक्ष, बहुजन हिताय फाउंडेशन, चंद्रपूर, विजयराव टोंगे, माजी जिल्हा चिटणीस स्काऊट चंद्रपूर, ऋषीजी ताकसांडे,सचिव, बहुजन हिताय फाउंडेशन चंद्रपूर, अजय जयस्वाल, संजय यादव, रुद्रनाथ तिवारी, उज्वला टापरे, सदस्य, ग्रामपंचायत, पद्मापूर, जिल्हा संघटक (स्काऊट ) चंद्रकांत भगत , मेळावा प्रमुख किशोर उईके , कार्यक्रम प्रमुख शांताराम उईके, मेळावा उप प्रमुख (स्काऊट) यशवंत हजारे, मेळावा उप प्रमुख (गाईड ) रंजना किन्नाके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले तर प्रास्ताविक मेळावा प्रमुख किशोर उईके यांनी केले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा संघटक स्काऊट चंद्रकांत भगत यांनी मानले. सायंकाळी सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ब्रिजभूषण पाझारे,माजी सभापती, समाजकल्याण, जी. प. चंद्रपूर यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्ह्णून राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) तथा जिल्हा मुख्य आयुक्त, स्काऊट, चंद्रपूर, निकिता ठाकरे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) तथा जिल्हा चिटणीस , चंद्रपूर, गंगाधर वैद्य, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर, यांची उपस्थिती होती.
उद्घाटनिय कार्यक्रमात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले बालवयात सुसंस्कार सोबतच देशभक्ती,देशप्रेम आणि उत्तम चारित्र्य, आरोग्य, व्यवसाय, सेवा देणारे शिक्षण या स्काऊट गाईड च्या चळवळीतून मिळते. त्यामुळे स्काऊट -गाईड ही चळवळ घरोघरी पोहचावी असे प्रतिपादन किशोर जोरगेवार यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शाळांचे ९९५ च्या वर विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले असून या मेळाव्यात प्रथमोपचार, संचलन (मार्चपास), ग्याझेट व तंबू निरीक्षण, शारीरिक कवायती, मानवी मनोरे, कार्यक्रम, विविध सामाजिक संदेश, जनजगृतीपर शोभायात्रा, साहसी खेळ इत्यादी स्पर्धा होणारआहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment