Ads

अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालक व ईतर सहभागी आरोपींवर भद्रावती पोलिसांची मोठी कार्यवाही

भद्रावती तालुका प्रतिनिधी(जावेद शेख) :-पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा मांगली गावाच्या नजीक असलेल्या नाल्यामध्ये रेतीचा भरपुर मोंठ्या प्रमाणावर नैसर्गीक साठा असल्याने त्या नाल्यसामधुन रात्रीदरम्यान रेती तस्करांकडुन अवैद्यरित्या रेतीची सतत चोरी होत असल्याची माहीती दिनांक २४/०१/२०२४ चे रात्रौदरम्यान भद्रावती पोलीसांना प्राप्त झाली होती.
Bhadravati police action against the tractor driver owner and other accused involved in illegally smuggling sand
त्या अनुशंगाने भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी रेती तस्करांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन भद्रावती येथील सपोनि राहुल एस किटे व पो.स्टॉफ पोहवा धर्मराज मुंडे ब.न. २४२१, चालक पो. हवा. जगदिष ब.न.२६५, नापोअ जगदिष झाडे ब.न.२४४५, नापोअ निकेष बेंगे ब.न.२४९४, ना.पो.अ. विष्वनाथ चुदरी ब.न.२४९६ यांचे पथक तयार करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यावरून दिनांक २४/०१/२४ रोजी मांगली येथील नाल्याजवळ रात्रौदरम्यान पंचासह सापळा रचुन असता मांगली नाल्यामधुन एकापाठोपाठ एक असे एकुण चार ट्रॅक्टर येत असतांना दिसल्याने त्यांना नाल्यामध्येच थांबवुन पंचासमक्ष ट्रॅक्टरची पाहणी केल असता त्यामध्ये प्रत्येकी १ ब्रास प्रमाणे एकुण ४ ट्रॅक्टरमध्ये ४ ब्रास रेती अवैद्यरित्या चोरी करून घेवुन जात असतांना मिळुन आले, त्यावरून
खालील नमुद वर्णनाचा मुदद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. १) कि. ५,००,००० - एक लाल रंगाचा मुंडा असलेला महीन्द्रा 475 DI विनाकमांकाचा व लाल रंगाची विनाकमांकाची ट्रॉली कि. ५००० -एक ब्रास रेती,२) कि. ५,००,००० एक लाल रंगाचा मुंडा असलेला महीन्द्रा 475 DI के MH 29 V1713 व लाल रंगाची विना कमांकाची ट्रॉली रु.५०००एक ब्रास रेती
३) कि. ५,००,००० एक लाल रंगाचा मुंडा असलेला महीन्द्रा 475 DI के MH 32 B 1177 व लाल रंगाची ट्रॉली कंमांक कि. ५०००
MH 34 L 9081 एक ब्रास रेती,४) कि. ५,००,००० - एक लाल रंगाचा मुंडा असलेला महीन्द्रा 475 DI के MH 36L2151 व लाल रंगाची विनाक्रमांकाची ट्रॉली
कि. ५००० - एक ब्रास रेती असा एकुण २०,२०,०००/रू चा माल शासनाचा कोणताही परवाना तसेच महसुल विभागाची परवानगी न घेता अवैद्यरीत्या चोरी करून वाहतुक करीत असता मिळुन आल्याने आरोपी १) प्रजीत सुभाष खामनकर वय २६ वर्ष रा. मांगली ता भद्रावती २) समीर बंडु चौधरी वय २१ वर्ष रा. मांगली ता भद्रावती ३) आशिक नामदेव कोटनाके वय २८ वर्ष रा. मांगली ता भद्रावती ४) विकास भिमराव कोटनाके वय ३० वर्ष रा. मांगली ता भद्रावती ५) महेन्द्र महादेव बोढेकर, वय २४ वर्ष, रा. मांगली ६) रितीक अजाब पाटील, वय २१ वर्ष, धंदा मजुरी,रा. मांगली ७) सनी कमलाकर कुमरे, वय २४ वर्ष रा. मांगली ८) मनोहर चिंदु कोटनाके, वय ४० वर्ष रा. मांगली ९) अमोल परशुराम कोटनाके, वय ३० वर्ष रा. मांगली १०) तुकाराम अशोक बोढेकर, वय २९ वर्ष रा. मांगली ११) गणेश वसंता डेंगळे, वय ३० वर्ष , धंदा मजुरी रा. मांगली व पाहीजे ट्रॅक्टर मालक आरोपी नामे १२) राकेश कामटकर रा. सुमठाना भद्रावती १३) रूपेश उरकुडे रा. सुमठाना भद्रावती १४) श्रीकृष्ण जिवतोडे रा. गवराळा भद्रावती १५) भारत बोढेकर रा. मांगली ता. भद्रावती त्यांचेवर कलम ३७९,३४.भा.दं. वि. प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीकारी वरोरा, पोनि बिपीन इंगळे पो स्टे भद्रावती यांचे मार्गदर्षनाखाली सपोनि राहुल एस किटे व पो स्टॉफ पोहवा धर्मराज मुंडे ब.न. २४२१, चालक पो.हवा. जगदिप ब.न.२६५, नापोअ. जगदिष झाडे ब.न.२४४५, नापोअ निकेष देंगे ब.न. २४९४, ना.पो.अ. विश्वनाथ चुदरी ब.न.२४९६ यांनी केली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment