Ads

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाची कारवाई.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-तालुक्यातील चारगाव येथील वर्धा नदी घाटावरून रेतीची अवैध तस्करी करीत असलेल्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाद्वारे दिनांक २६रोज शुक्रवारला रात्री सात वाजताच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत अवैध रेतीने भरलेले ट्रॅक्टर महसूल विभागाद्वारे ताब्यात घेण्यात आले आहे.
Bhadravati Revenue Department action against tractors smuggling illegal sand.
सदर ट्रॅक्टर हे तालुक्यातील चारगाव येथील वर्धा नदीवरून अवैधपणे रेती भरून भद्रावती शहराकडे येत होते.याची माहिती महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर मंडळ अधिकारी अनिल दडमल व तलाठी मस्के यांनी विंजासन रोडवर या ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन ट्रॅक्टरला तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले. पुढील कारवाई महसूल विभाग करीत आहे. सध्या भद्रावती शहर व तालुक्यात रेती तस्करीला उधान आले असून गौण खनिज पथकाद्वारे अवैध रेती तस्करांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. मात्र त्यांच्या डोळ्यात धुळ झोकुन अवैध रेती तस्करी सुरूच आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment