Ads

भद्रावती पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड Bhadravati police raid gambling den

तालुका प्रतिनिधी जावेद शेख:- 26/01/2024 रोजी दुपारी दरम्यान बरांज तांडा गावाच्या मागच्या जंगलमध्ये मोठा जुगार भरलेला आहे अशा खात्रीलायक मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार तत्काळ पोलीस पथक तयार करून धाड मारण्यासाठी रवाना केले असता जुगार खेळत असलेल्या लोकांना पोलिसांची चाहूल लागताच त्यातील काही लोक जंगलामध्ये पळून गेले.
Bhadravati police raid gambling den
 त्यापैकी मिळून आलेले उर्वरीत इसम व ते खेळत असलेल्या डावा वरील पैसे आणि 8 मोटर सायकल वाहने असे मिळून 4,62,200/- रुपये चा मुद्देमाल पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आला. त्यावरून पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक.  41/2024 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये एकूण 11 आरोपींवर कारवाई करण्यात आली. 
            सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर,  मा. अपर पोलीस अधीक्षक मॅडम चंद्रपुर, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे पोलीस स्टेशन भद्रावती यांचे मार्गदर्शनात API/ राहुल किटे, PSI/ कोल्हे, HC/1306, NPC/2496, 2494, 2445, PC/1090, 1260, 1628 यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment