Ads

75 फूट उंचीच्या तिरंग्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन 75th Republic Day 26 जानेवारी हा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी आठ वाजता शहरातील सेवादल मैदानात 75 फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Hoisting of the 75 feet tall tricolor flag by MLA Pratibhatai Dhanorkar.
यावेळी भद्रावती नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते व तसेच मुख्याधिकारी विशाखा शेळकी,यांचे हस्ते नगरपालिकेत झेंडावंदन करण्यात आले . भद्रावती तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सध्या आपल्या प्रोफेशनल पिरेडवर असलेले उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तथा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भद्रावती पोलीस स्टेशनच्या प्रांगणात ठाणेदार विपिन इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशनमधील अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय शहरातील गांधी चौक, हुतात्मा स्मारक, वनपरिक्षेत्र कार्यालय, शहरातील शाळा तथा महाविद्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गणराज्य दिनाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment