Ads

ग्रामीण पत्रकार संघाचा रौप्यमहोत्सव सोहळा रविवारी नवीमुंबईत

मुंबई:- ग्रामीण पत्रकार संघाचा रौप्यमहोत्सवी सोहळा नवी मुंबई येथील कोर्टयार्ड या पंचतारांकित हॉटेल्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना *महाराष्ट्र रायझिंग स्टार* पुरस्कार देऊन अभिनेता सयाजी शिंदे यांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्याला वृत्तपत्र व सीनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे.
Silver Jubilee Ceremony of Gramin Patrakar Sangh in Navi Mumbai on Sunday

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कार्यरत पत्रकारांचे सशक्त संघटना असलेल्या ग्रामीण पत्रकार संघाच्या स्थापनेचे रौप्यमहोत्सव राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण पत्रकार संघाच्या मुंबई विभागातर्फे या अनुषंगाने महाराष्ट्रातील व्यवसाय, उद्योजक, स्टार्टअप, वैयक्तिक, कलाकार, ज्वेलर्स, रिअल इस्टेट, शिक्षण, आरोग्यसेवा, निरोगीपणा अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.हा सोहळा नवी मुंबई नेरुळ येथील कोर्टयार्ड मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये २८ जानेवारी रविवारी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला अभिनेता सयाजी शिंदे, अभिनेत्री दिपाली सैयद,ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे,वृत्तवाहिनीच्या निखिला म्हात्रे,ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गजानन वाघमारे,माजी संचालक डीजीपीआर देवेंद्र भुजबळ, मंत्रालय विधीमंडळ जेष्ठ पत्रकार अनिल महाजन,मोटीव्हेशनल स्पिकर विलास बडे,माजी दुरदर्शन संचालक डॉ मुकेश शर्मा,कार्यकारी संपादक नवराष्ट्र नरेंद्र कोठेकर, कृषिभूषण शिवराम घोडके, मुंबई विभाग अध्यक्ष स्वप्निल दुधारे, मुंबई जिल्हाध्यक्ष अमोल राणे व राज्य कार्यकारिणी सदस्य, सर्व जिल्हाध्यक्ष तसेच मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध रेडिओ जॉकी रिया सेनगुप्ता करणार आहेत. अशी माहिती राज्य प्रवक्ता अनंत गावंडे यांनी दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment