चंद्रपुर :-गजानन गावंडे गुरुजी उत्तम शिक्षक होते. त्यांनी शिक्षणाच्या प्रचार प्रसाराचे महत्वाची भूमिका बजावली होती. शिक्षकी पेशातुन निवृत्त झाल्यावर त्यांनी सामजिक आणि राजकिय क्षेत्रात आपले योगदान दिले. सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. राजकारणासह ते एक निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने आज शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व कायमच हरपल असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
Guiding leadership in educational, social and political fields is lost forever. Kishore Jorgewar सामाजिक आणि राजकिय जीवनात गावंडे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभायचे. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. अनेक कार्यक्रमा प्रसंगी त्यांची भेट होत असायची यावेळी त्यांच्या बोलण्यातून त्यांच्यात असलेली समाजकार्याची आवड लक्षात यायची. ते नेहमी प्रोत्साहीत करायचे, ते शिक्षकी पेशातून निवृत्त झाले मात्र समाज कार्यातुन ते कधीही निवृत्त झाले नाही. त्यांच्या अचानक आमच्यातून निघून जाण्याची वार्ता वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हाणी झाली आहे. माता महाकाली गावंडे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो अशी प्रार्थनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केलेल्या शोकसंदेशातुन केली आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे खंदे कार्यकर्ते हरपले
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी चंद्रपूर जिल्हा कार्यवाह, माजी विभागीय कार्यवाह, माजी बोर्ड मेंबर तथा राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री गजाननराव गावंडे गुरुजी यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.
श्री. गावंडे गुरुजी हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे एक खंदे कार्यकर्ते होते. त्यांनी विमाशी संघाच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या स्थापनेपासून विमाशी संघाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते संघाच्या विभागीय कार्यवाहपदीही कार्यरत होते. त्यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षकांच्या हक्कासाठी व कल्याणासाठी अनेक चळवळी उभारल्या.
श्री. गावंडे गुरुजी हे एक उत्कृष्ट शिक्षकही होते. त्यांनी अनेक वर्षे शिक्षक म्हणून कार्य केले. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल राज्य पुरस्कारही प्राप्त झाला.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. माझ्या विजयात गुरुजींचा सिंहाचा वाटा होता.
श्री. गावंडे गुरुजी यांचे निधन विदर्भातील शिक्षकांसाठी एक मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनाने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, हीच प्रार्थना!
- सुधाकर अडबाले
आमदार, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment