Ads

सराईत गुन्हेगाराकडून ०१ देशी कट्टा व ०२ जीवंत काडतुस जप्त

चंद्रपुर :-जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मा. श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध रित्या हत्यार बाळगणा-यांवर माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते.
01 country katta and 02 live cartridges seized from criminal
सदर मोहिमेदरम्यान पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, मौजा पडोली येथील डी.एन.आर. ऑफीसचे मागे रेल्वे लाईनजवळ एक इसम आपले कमरेला गावठी देशी कट्टा लावून उभा आहे. सदर माहितीवरून पोउपनि. भुरले त्यांच्या टिमसह तात्काळ रवाना होवून सदर इसमास ताब्यात घेवून त्याची तपासणी केली असता, सदर इसमाच्या कमरेला लागून असलेला एक देशी कट्टा तसेच त्याच्या पँटच्या खिशात देशी कट्यात वापरण्यात येणारे ०२ नग जीवंत काडतुस मिळून आले. सदर इसमाचे नाव विचारून त्याचा क्राईम रेकॉर्ड तपासला असता त्याचेवर पोस्टे घघ्युस, पोस्टे राजुरा, पोस्टे वरोरा येथे अनेक चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. तसेच सदरचा इसम हा चोरी, घरफोडी तसेच इतर गुन्ह्यांमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये फरार आहे. सदर इसमाविरूद्ध पोस्टे पडोली येथे अवैधरित्या शस्त्र बाळगणेबाबत गुन्हा नोंद केला असून सदर इसमास पुढिल तपासकामी पोस्टे पडोली यांच्या ताब्यात देण्यात आले.

आरोपीचे नाव :- नौशाद शाहादातुल्ला कुरेशी, वय ३२ वर्ष, धंदा मजुरी, रा. वार्ड नं. २, बँक ऑफ इंडीयाचे मागे, घुघ्युस, ता. जि. चंद्रपुर

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि, बोबडे, सपोनि, नागेशकुमार चतरकर, सपोनि. किशोर शेरकी, पोउपनि. विनोद भुरले, पोहवा. संजय आतकुलवार, नापोकों, संतोष येलपुलवार, पोकॉ. गोपाल आतकुलवार, पोकॉ. नितीन रायपुरे यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment