भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख: राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य (जेईई – मेन्स) NTA) Joint Entrance Examination-Main (JEE – Mains) for admission to engineering, technology courses या परीक्षेतील पेपर एकचा निकाल जाहीर केला. त्यानुसार ग्लोरिअस अकादेमी(Glorious Academy)च्या 25 पैकी 6 विद्यार्थ्यांना 90 पर्सेंटाइल पेक्षा अधिक मिळाले असून 80 पेक्षा जास्त पर्सेंटाइल घेणारे भरपुर विद्यार्थी आहे , ग्लोरिअस अकादमी मधील श्रेयश नगराळे 97.23% अव्वल निकाल् देणारा ठरलेला आहे, श्रेयश चे वडील पान ठेला चालवितात व आई गृहिनी आहे. तो आपल्या आई वडील सोबत गौतमनगर येथे वास्तव्यास राहतो. भद्रावतीत राहुन ग्लोरिअस अकादेमी येथे शिक्षण घेऊन सुद्धा आपन गुणवत्ता यादित येऊ शकतो हे यावेळी श्रेयश नगराळे याने विशेष नमूद केले.
आयुष हसनेंद्र मुनेश्वर याने 95.83% ,संजना गुरुचल याने 94.36%, ध्रुव गढ़िया याने 91.23%, आस्था शर्मा 90.27, व क्रिष नैताम 90.27 घेतले आहे सर्व विद्यार्थ्याने आपल्या यशाचे श्रेय पालक आई वडील व ग्लोरिअस अकादमी च्या शिक्षक व व्यवस्थापक ला दिले आहे.सर्व विद्यार्थ्याचे निकालाचे सर्वत्र अभिनन्दन व कौतुक होत आहे.
एनटीएने जानेवारी सत्रातील जेईई मुख्य परीक्षा २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत एकूण ५४४ परीक्षा केंद्रांवर संगणकीय पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेसाठी १२ लाख २१ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ११ लाख ७० हजार ४८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. मराठीसह एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.
0 comments:
Post a Comment