Ads

पप्पा चालाना घरी,जेवण नाही करत का.? चिमुकल्याची हृदयस्पर्शी विनवणी.

गडचांदूर :-दि सेंच्युरी लिमिटेडच्या अल्ट्राटेक युनिट क्रमांक 2, माणिकगड सिमेंट कंपनीने UltraTech Unit No. 2 of The Century Limited, of Manikgad Cement Company या शहराची वाट लावली आहे.गडचांदूर शहराच्या जवळपास 50 हजार लोकसंख्येतून 50 टक्के लोक आजारी पडत आहे.प्रदुषण नियंत्रण मंडळ याठिकाणी कार्यरत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रण मंडळ फक्त कंपनीची डिपॉझीट जप्त करून,जर कारवाई केल्याचे दाखवत असेल तर,ती केवळ तोंडाला पाने पुसण्याची बाब आहे.ज्या कंपनीमुळे या गावचे जल,जंगल,जमीन,नष्ठ होत आहे,लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,ऐवढेच नाही तर याठिकाणी बेरोजगारांची फौज उभी झालेली आहे.या बेरोजगारांच्या हाताला काम नाही,मग काय चोऱ्या करायच्या का ? अशी विचारणा तरूण करताना दिसत आहे.शिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने कित्येक शिक्षित तरूण वाम मार्गाने जाऊन आपले भविष्य अंधारात टाकत असल्याचे दिसून येत आहे.काही अपवाद वगळता माणिकगड सिमेंट कंपनीने स्थानिकांच्या नावाखाली केवळ परप्रांतीयांचा भरण करून स्थानिक पात्र शिक्षित तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचे संतापजनक आरोप होत आहे.
Papa walks home, doesn't U eat? The touching plea of ​​a toddler.
एकीकडे बेरोजगारीची समस्या बिकट असतानाच दुसरीकडे या कंपनीच्या डस्ट प्रदूषणामुळे गडचांदूर व परिसरातील नागरीकांचे जीव धोक्यात आले आहे.दमा, फुफ्फुस, हृदयाचे विकार,शरीरावर खाज, खुजली,खोकला,इतर जीवघेण्या रोगांची लागन होत आहे.यासर्व जीवघेणा समस्यांवर उपाययोजना सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मनसे कोरपना तालुकाध्यक्ष 'सुरेश कांबळे' यांनी गडचांदूर येथे गेल्या 14 फेब्रुवारी पासून 'अन्नत्याग आंदोन' Food sacrifice protestसुरू केले आहे.आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून शासन-प्रशासन,लोकप्रतिनिधी,कंपनी प्रशासन,यापैकी कुणीही याची दखल घेतली नसल्याने आश्चर्ययुक्त खंत व्यक्त होत आहे.दरम्यान आंदोलनकर्ते 'सुरेश कांबळे' गेल्या चार दिवसापासून आपल्या घरी न गेल्याने त्यांचा साडे तीन वर्षाचा मुलगा आंदोलनस्थळी येऊन कांबळेंच्या जवळबसून "पप्पा घरी चालना,जेवण नाही करत का ?" अशी विनवणी करत होता. चिमुकल्याच्या या हृदयस्पर्शी विनवणी ऐकून आंदोलन मंडपात उपस्थित लोकांचे मन हेलावून गेले होते.
माणिकगड{अल्ट्राटेक}सिमेंट कंपनीकडून दैनंदिन होत असलेल्या डस्ट प्रदूषणामुळे शहरातील जनता मोठ्या प्रमाणात त्वचा रोग,किडनी विकार,दमा,असे गंभीर आजाराने त्रस्त आहे.यावर संबंधित कंपनीवर कठोर कार्यवाही व्हावी,कंपनीने दत्तक घेतलेल्या गावांचा सीएसआर फंडातून विकास करावा,दत्तक घेतलेल्या गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना पॅकिंग प्लांट व सप्लाय वेजबोर्ड नुसार कामावर सामावून घ्यावे व स्थानिकांना प्राधान्य द्यावे,कंपनीतील ट्रान्सपोर्ट वाहने नो-पार्किंग झोन मधील व शहराच्या परिसरात उभे केलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करून रस्ता मोकळा करावा व इतर जनहिताच्या मागण्या घेऊन कांबळे यांनी सदर आंदोलन सुरू केले आहे.ह्या सर्व मागण्या मार्गी लागल्याशिवाय आता माघार नाहीच ! या भूमीकेवर कांबळे ठाम असून समर्थकांमध्ये कंपनी विरोधात रोष व्यक्त होत आहे.गोवारीगुडा,बांबेझरी,नोकारी,मानोली,पुगडीपठार,जामनी,थुट्रा व परिसरातील इतर गावातील तरूणांची उपस्थिती होती.आता सदर आंदोलनाचे पुढे काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment