घाटंजी : मागील वर्षी खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तालुक्यासह पंगडी येथील शेतकऱ्यांनी पिक विमा काढला.जुलै - ऑगस्ट च्या अतिवृष्टीने तालुक्यासह पंगडी परिसरात कापूस, तूर ,सोयाबीन या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते, अनेक ठिकाणी पुरामुळे जमिनी खरडून गेल्या.अशी विदारक परिस्थिती असताना सुद्धा संबंधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यास टाळाटाळ होत आहे.रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क केला असता संबंधित शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट झाल्याचे सांगतात.Pay crop insurance compensation
अशा बोगस विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, जुलै - ऑगस्ट महिन्यात विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन सर्वे केल्यावर पैशाची मागणी करीत होते त्यांना संबंधित शेतकऱ्याने पैसे न दिल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवले आहे.
तरी तालुका प्रशासनाने तात्काळ चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अन्यथा पंगडी ग्रामवासी यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी माजी सरपंच गजानन काकडे, महादेवराव परिहार ,अनिल भोयर, अमोल ठक, संदीप काकडे, अचित भेजुरकर, गजानन उदार, अमोल काकडे, भाऊराव काकडे ,मुकेश देऊरकर, गणेश काकडे , पंकज चौधरी, राजु काकडे, संगीत काकडे, प्रमोद काकडे, विनोद कोरंगे, लक्ष्मण काकडे , रवींद्र परिहार, कृष्णराव ठाकरे इत्यादी शेतकरी बांधव हजर होते.
0 comments:
Post a Comment