माजरी/ भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-महाशिवरात्रीनिमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे दर्शणाकरीता गेलेले काही तरुण वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी घडली. विठ्ठलवाडी येथे वास्तव्यास असलेल्या मित्रांचा समूहच नदी पत्रात उतरले त्यातील तीन तरुण नदीत बुडाल्याची घटना 8 मार्चला सायं.5 वाजताच्या सुमारास घडली. रात्री त्यांचा नदी पात्रात शोध घेतला असता कोणताच थांगपत्ता नदीपात्रात लागला नव्हता. म्हणून 9 मार्च रोजी सकाळीच रेस्क्यू टीमद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली असता नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता आधी संकेत पुंडलिक नगराळे याचा मृतदेहच आढळून आला लगेचच अनिरुद्ध चाफले परंतु तिसरा तरुण 9 मार्च ला सायंकाळ पर्यंत शोध घेऊनही हर्षद चाफले हा सापडला नव्हता शेवटी 10 मार्च चा पहाटे नदीचा काठावर तरंगतांना दिसून आला.
शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील मित्र महाशिवरात्रीनिमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे मंदिर दर्शनाकरिता गेले होते. भटाळी वरून परत येतांना त्यांना मार्गातील वर्धा नदीवर आंघोळीचा मोह सुटला.हे सर्वच मित्र वर्धा नदी पात्रात आंघोळी करीता गेले. दरम्यान आंघोळ करतांना पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षद अतिश चाफले वय अंदाजे १६ वर्ष ,चुलत भाऊ अनिरुद्ध चाफले २२ व संकेत पुंडलिक नगराळे वय अंदाजे २६ वर्ष हे अंगोळीला उतरले असता त्यातील दिघेही जण वाहून गेल्याची घटना काल दि.8 मार्च रोजी हृदयद्रावक घटना घडली. अखेर सकाळी 9 च्या दरम्यान ता.9 मार्च रोजी रेस्क्यू टीमद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली असता नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता खोलवर वाहून गेलेल्या तिन तरुणांपैकी दोघांचे मृतदेहच हाती लागलेहोते.या मयत दोन्ही तरुणांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले. त्यातील मयत संकेत नगराळे यांचे पार्थिव शरीर कुटुंबीयांना सोपविण्यात आले व त्याचा पार्थिवावर 9 मार्च रोजी अत्यंसंस्कार विधीही करण्यात आले . 9 मार्च रोजी सायं पर्यंत शोधूनही हर्ष चा मृतदेह सापडलाच नव्हता शेवटी 10 मार्च चा पहाटे हर्ष चा मृतदेह नदीचा काठावर तरंगताना दिसून आला.
त्या हर्ष चा मृतदेहला शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले.पुढील तपास वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment