जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती :-शहरातील दुधाळा तलावा काठावरील दूधशेष मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या दोन आरोपींना भद्रावती पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेची चुणूक दाखवीत अवघ्या बारा तासांच्या आत अटक केली आहे. शुभम विठ्ठल झाडे व 28 वर्ष व हेमंत मधुकर ताटेवर वय 42 वर्षे राहणार,भद्रावती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या दोन्ही आरोपींना न्यायालयात सादर केले असता त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाववण्यात आली आहे. सदर मंदिरातील दानपेटी फोडण्याची घटना दिनांक नऊ रोज शनिवारला सकाळी उघडकीस आली होती. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा करीत आपल्या खास पद्धतीने तपासाला सुरुवात केली. तपासाची सूत्रे फिरवीत त्यांनी 12 तासांच्या आत सदर दोन्ही आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. या घटनेचा छडा लावण्यासाठी ठाणेदार बीपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात रोहित चेटगिरे, विश्वनाथ चुदरी , जगदीश झाडे, निकेश ढेंगे, योगेश घाटोळे आदींनी चोख कामगिरी बजावली.
0 comments:
Post a Comment