Ads

लोकसभा निवडणूक - २०२४ पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूसाठा नष्ट

चंद्रपुर :-आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दल सक्रिय झाला असन मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. रिना जनबंधू, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदशीखाली अवैदय दारू निर्मिती वाहतूक व विकि वर आळा घालण्याकरीत चंद्रपूर पोलीसांनी धडक मोहिम हाती घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या तोंडावर जिल्हात मोठया प्रमाणत हातभट्टी तसेच अवैदय मद्य निर्मिती वाहतूक आणि विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
In the Wake of Lok Sabha Elections - 2024, a large amount of liquor stock was destroyed by local crime branch, Chandrapur and P.S. Joint Proceedings of Virur
त्याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापण करण्यात आले असून सदर पथकाचे माध्यमातून मोठया प्रमाणात अवैदयरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांचे माहिती काढून त्यावर कारवाई सुरू असून जिल्हयात ठिकठिकाणी तयार होणारी हातभट्टी व परराज्यातून वाहतूक होणारी अवैद्य दारू यावर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष लक्ष आहे.

आज दि. १८/०३/२०२४ रोजी सकाळचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे. विरूर अंर्तगत मौजा थोमापुर येथे काहि इसम व मौजा मुडीगेट येथे एक इसम हातभट्टी लावून अवैद्रद्यरित्या दारू गाळीत आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पो.स्टे. विरूर यांचे पथकासह रवाना होवून मौजा थोमापूर येथे पोहचून शोध घेतला असता दोन घराचें परिसरात हातभट्टी दारू सडवा व हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३१,२००/- रू. चा माल मिळून आले. तर मौजा मुडीगेट येथील एका महिलाच्या घरा मागे कायदेशिररीत्या झडती घेतली असता सदर घटनास्थळावर हातभट्टी दारू सडवा व हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण २७,२००/- रू. चा माल मिळून आला. सदरचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला असून गून्हयातील फरार आरोपी नामे १) रवि भद्रु सभावत, रा. थोमापूर ता. राजुरा, २) किसन बिच्चा घुगलोत, थोमापुर ता. राजुरा ३) कविता मालोत, रा. मुडीगेट ता. राजुरा यांचे विरूध्द पो.स्टे. विरूर येथे कलम ३२८ भादवी सहकलम ६५ मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनी हर्षल ऐकरे, सपोनि मनोज गदादे, सपोनि संतोष वाकडे, पोहवा नितिन साळवे, सुभाष गोहोकार, अनूप डांगे, नितेश महात्मे, पोशि प्रसाद धुलगुंडे, मिलिंद जांभुळे, चालक पोहवा दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर तसेच पोहवा सुभाष कुळमेथे, मलया नलगेवार, पो.शि. सचिन थेरे, गजानन चारोळे, लक्ष्मीकांत खंडाळे, प्रमोद मिलमिले, राहूल वैद्य, मपोशि प्रियंका राठोड, मंगला मेश्राम सर्व पो.स्टे. विरूर यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment