Ads

वरोरा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

(सादिक थैम) वरोरा: राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमेचा शुभारंभ 3 मार्च रोज रविवारला येथील उपजिल्हा रुग्णालय येथील प्रथम बूथ वर करण्यात आला. शहरातील सर्व केंद्रावर आज 2950 लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यात आला.
National Pulse Polio Campaign launched at Warora
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.प्रफुल खुजे यांच्या हरसिक रसिका सुनील गायकवाड नामक नऊ महिन्याच्या मुलीला पल्स पोलिओ डोज पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

वरोरा शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यासाठी एकूण 32 बूथचे नियोजन करण्यात आले आहे . 0 ते 5 वर्ष वर्षाखालील 3143 लाभार्थींना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी 2950 लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यात आला. या मोहिमेअंतर्गत 3 मार्चला सुटलेल्या लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. ही मोहीम 5 मार्च ते 9 मार्च पर्यंत चालू राहणार आहे.घर भेटी देण्याकरिता 15 टीमचे नियोजन करण्यात आले आहे.जेणेकरून शहरातील एकही लाभार्थी पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विरुटकर ,परिसेविका सरस्वती कापटे, इंदिरा कोळपे, अधिपरिचारिका रुबीना खान व प्रियंका दांडेकर , आरोग्य सहाय्यक सतीश येडे, आरोग्य मित्र अमोल भोंग,आरोग्यसेवक देव जुलमे हे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment